जाहिरात... Advertisement... विज्ञापन

महाविकास आघाडी सरकार बरखास्त करा.. भाजपाची मागणी. #bjpchandrapur

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे निषेध आंदोलन.

5 जुलै-महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिवस.


चंद्रपूर:- राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे.आणि आता जनतेचा आवज बुलंद करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे घटनादत्त अधिकार हिरावून घेत आहे.विधिमंडळाचे 2 दिवसीय अधिवेशन असले तरी,कोणतीही चर्चा तेथे होणार नाही.हि बाब भारतीय लोकशाहीची हत्या करणारी आहे.त्या मुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्यात यावे,अशी मागणी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तर्फे राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
#bjpchandrapur


राज्य शासनाने विधिमंडळाचे 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन (5 व6 जुलै)बोलावले.पण याचा कोणताही उपयोग नाही,म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे सोमवार(5जुलै)ला" महाराष्ट्रतील लोकशाही वाचवा दिवस "ची घोषणा करीत जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करीत राज्य शासनाचा निषेध केला.


यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,जिप अध्यक्ष संध्या गुरनुले,महापौर राखी कंचर्लावार,उप महापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती रवी आसवानी,मनपा सभागृह नेते संदीप आवारी,नगराध्यक्ष हरीश शर्मा,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, मनपा सभापती चंद्रकला सोयाम, झोन सभापती राहुल घोटेकर यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी भोंगळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित केले.ओबीसी आरक्षण,मराठा आरक्षण,कोरोना विरुद्ध लढा,अश्या अनेक मुद्द्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे.या सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही म्हणून हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना डॉ गुलवाडे म्हणाले,राज्यात जेव्हापासून शिवसेना ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या महाविकास आघाडी चे सरकार आले तेव्हापासून राज्याची स्थिती गंभीर झालेली आहे.राज्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार अपयशी ठरले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य जनतेला न पटणारे निर्णय हे सरकार घेत असून आता तर या सरकारने लोकप्रतिनिधींना पण रडारवर घेतले आहे.
राज्य सरकारने फक्त 2 दिवसाचे पावसाळी विधिमंडळ अधिवेशन (5 व 6 जुलै) बोलावले आहे. हे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा ठरणार आहे.कारण राज्यासमोरील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा या अधिवेशनात होणार नाही. विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार, प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी व्यापगत केले आहेत. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते, हे आता स्पष्ट झाले आहे.सभागृहात लोकप्रतिनिधींना बोलू दिले जात नसेल तर ती लोकशाहीची थट्टा असून हा भारतीय राज्य घटनेचा अपमान आहे, असे आम्ही समजतो.या प्रकारामुळे महाराष्ट्रातील लोकशाही धोक्यात आली आहे.संविधानाची रक्षा करण्याची भाषा करणारेच आता संविधान तुडवत आहेत असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.त्यामुळे भारतीय जनता पार्टीने 5 जुलै,सोमवार हा दिवस "महाराष्ट्रतील लोकशाही वाचवा दिवस"म्हणून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शने करीत पाळला आहे.अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी,चंद्रपुर महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत असून हे सरकार बरखास्त करण्यात यावे व लोकशाही वाचवावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी भाजपाच्या शिष्ठमंडळाने राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन सादर केले. संचालन व आभार ब्रिजभूषण पाझारे यांनी केले.
यावेळी भाजपा नेते अल्का आत्राम,विवेक बोढे, नामदेव डाहुले,राजू गोलीवार, सचिन कोतपेल्‍लीवार, विठ्ठलराव डुकरे, रवी लोणकर, संदीप आगलावे, मोहन चौधरी, अनिल फुलझेले, रामपालसिंह, सूर्यकांत कुचन वार, शीलाताई चव्हाण,शैलेंद्र शुकला, मनोज सिंघवी, निलेश बेडेकर, देवानंद वाढई, प्रदीप किरमे, प्रशांत चौधरी, गणेश गेडाम ,सागर भगत, गणेश राम गुंडेवार, गजानन भोयर, हिमांशू गादेवार, हेमंत गुहे, महेंद्र मंडलेचा, यश बांगडे,राहुल पाल, सुनील डोंगरे, प्रभा गुडधे, शीतल गुरनुले, माया उईके, वंदना जांभूळकर, अर्चना उरकुडे, दिनकर सोमलकर,डॉक्टर गिरीधर येडे, पुष्पा उराडे, रंजीता येले, रेणुका घोडेस्वार, मोनिषा महातव, कविता सरकार, निर्मला उरकुडे, सिंधू राजगुरे, सुषमा नागोसे, माया मांदाडे, लता तुम्मे, सविता कांबळे, छबू वैरागडे, वंदना संतोषवार,किरण बुटले,शोभा पिदूरकर, सुरज सरदम, शितल आत्राम, धनराज कोवे, शुभम गेडाम ,संदीप देशपांडे, विजय आग्रे ,विनोद खेवले,चांद भाई पाशा, सुभाष पिंपळशेंडे ,अमोल उत्तरवार, यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत