भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन.
मुंबई:- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. #maharashtra #Suspension #BJPMLA
भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?
आशिष शेलार - वांद्रे पश्चिम
संजय कुटे - जळगाव ( जामोद)
पराग अळवणी - विलेपार्ले मुंबई
अतुल भातखळकर - कांदिवली पूर्व
अभिमन्यू पवार - औसा, लातूर
जयकुमार रावल - सिंदखेडा, धुळे
गिरीश महाजन - जामनेर,
नारायण कुचे - बदनापूर, जालना
राम सातपुते - माळशिरस, सोलापूर
योगेश सागर - चारकोप, मुंबई
हरीश पिंपळे - मूर्तिजापूर, अकोला
किर्तीकुमार भांगाडिया - चिमूर, चंद्रपूर
या आमदारांना पुढील एक वर्षासाठी विधानसभेच्या मुंबई किंवा नागपूरच्या एकाही कामकाज सहभाग घेता येणार नाही, असा ठराव मांडण्यात आला आहे.