जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूरातील बार-दुकानांमध्ये पोहोचला मद्याचा साठा. #chandrapur #drink

दुकानदाराने ग्राहकाला तयार करुन दिला पहिला पेग.
(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा फेसाळत्या चषकला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आज 100 हून अधिक विदेशी आणि देशी दारू दुकानांना परवाने वितरित करण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाने हे परवाने दिल्यानंतर देशी आणि विदेशी दारू दुकानदारांनी आपल्या दारू साठ्याची बुकिंग करत आज दुपारपासून हा दारू साठा वितरित करण्यास सुरुवात केली आहे.
#chandrapur #drink
यात पहिली बाजी मारली आहे ती तेलंगणा सीमेवरील राजुरा तालुक्यातील देवाडा येथील देशी दारू दुकानाने. या ठिकाणी स्वतः दारू दुकानदाराने पहिल्या ग्राहकाला पेग बनवून देत दारू विक्री ला आरंभ केला.
यानंतर आता जिल्ह्यातील 100 हून अधिक देशी विदेशी दारू दुकानांमध्ये दारू विक्रीला प्रारंभ झाला आहे. मद्य शौकिनांनी यासाठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत