Click Here...👇👇👇

शेत शिवारात महिलेचा संशयास्पद मृत्यू. #death

Bhairav Diwase

चेहरा रक्ताने माखल्याने गुढ वाढले.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कुरखेडा:- येथील एका वृद्ध शेतकरी महिलेचा तिच्याच शेतात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शिलाबाई कुंडलिक कसारे (60 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. मृतदेहावर इतरत्र कोणतीही गंभीर दूखापत प्रथमदृष्टया दिसत नसली तरी चेहरा रक्ताने माखलेला आहे. त्यामुळे हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला की कोणी जड वस्तूने डोक्यावर मारून हत्या केली हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मृत शिलाबाई रविवारी दुपारच्या सुमारास वाकडी मार्गावर असलेल्या स्व:च्या शेतात तूर पेरण्यासाठी गेली होती. मात्र, रात्र होऊनही ती परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. रात्री शेतात शोध घेतला असता ती दिसून आली नाही. पण, पुन्हा सकाळी शोध घेत असताना शेतातच तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहीती मिळताच ठाणेदार सुधाकर देठे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला. शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मृत शिलाबाईच्या कुटुंबात पती, मुलगा, मुलगी व इतर सदस्य आहेत.