जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पीक पाहणी प्रकल्पाच्या कामात घोसरीचे 'मिशन मँथमेटीक्स'चे युवक सरसावले. #E-pick


(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- महसूल विभागाचा ई- पीक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. पोंभूर्णा तालुक्यात ई-पिक पाहणी ॲप चे माध्यमातून स्वताच शेतकऱ्यांना पिक पेऱ्याची नोंद करायची होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी पिक पेऱ्याच्या नोंदणीचे काम सुरू केले होते. मात्र ग्रामिण भागातील शेतकऱ्यांकडे प्रामुख्याने इंटरनेट व ॲंड्राईड मोबाईल नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. शिवाय वेळेची मर्यादा असल्याने वेळेत नोंदणी करणे हे मोठे आव्हान होते. #E-pick
शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी वेळेत पूर्ण करणे कसरतीचे झाले असल्याने घोसरी येथील 'मिशन मँथमेटीक्स'चे ३५ युवक मोबाईल अँपव्दारे पिकांची नोंद घेण्यास सहकार्य करीत आहेत. त्यामुळे पिक सर्व्हेक्षणात घोसरी साज्या तालुक्यात आघाडी घेतलेली आहे. पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी गावात ९०० च्या आसपास सातबारे असून घोसरी साज्याअंतर्गत ७ गावाचे व्याप्त क्षेत्र आहे.महसूल विभागाच्या ई- पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राबविण्यात येत असून टाटा ट्रस्टच्या सहाय्याने अँप्लिकेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे. शेतकरी अँपव्दारे आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतःच सात बाराच्या शेतजमिनीच्या उतारावर पिकाची नोंद करण्याची पध्दत आहे. त्यामुळे शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
ई- पिक पाहणी पोंभूर्णा महसूल साज्यातील पिकांची तलाठी नोंदी तपासून घेणार आहेत. सदर पाहणी मुदतीतच पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने नोंदणी करताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला समोर जावे लागत आहे. घोसरी साज्यातील शेत पिकाची पाहणी करताना ॲंड्राईड मोबाईल व तोकडी इंटरनेट सुविधा यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. मुदतीत पाहणी करण्यासाठी घोसरी येथील 'मिशन मँथमेटीक्स'चे अक्षय वाकुडकर यांच्या टीमच्या सहकार्याने पिक पाहणी सर्व्हेक्षणास प्रत्यक्ष शेतात भेटी देत आहे. शेतकऱ्यांच्या पीकाची नोंद करुन देत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतपिकाची अँपव्दारे नोंदणीसाठी सरसावले असल्याने घोसरी साज्याचे ई- पिक पाहणीत पोंभूर्णा तालुक्यात आघाडी घेत आहेत.
सध्या ई- पिक पाहणी ॲप मध्ये पोंभूर्णा तालुक्याचे काम सुरू असून महसूल प्रशासन, कृषी विभाग, सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी यांचेकडून ई-पिक पाहणी ॲप चे काम भरीव पद्धतीने करण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत