जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वर्धा नदी बोट दुर्घटना. #Wardha #river #boat #accident.

11 जणांपैकी आतापर्यंत 10 जणांचे सापडले मृतदेह.

अमरावती:- वरुड जवळील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील 13 जणांची वर्धा नदी बोट उलटली. यामध्ये दुर्घटनेदिवशीच (14 सप्टेंबर) 3 मृतदेहांचा शोध लागला होता. अन्य 10 मृतदेह शोधन्याचे काम बचाव पथकाकडून सुरू होते. #Wardha #river 
काल (15 सप्टेंबर) दिवसभरात एकही मृतदेह हाती लागला नव्हता. आज (16 सप्टेंबर) पहाटेपासून पुन्हा बचाव कार्य सुरू झाले. तब्बल 45 तासानंतर आज एकूण 7 मृतदेह हाती लागले. त्यामुळे आतापर्यंत 11 पैकी एकूण 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित एकाचा शोध घेण्याचे काम NDRF आणि SDRF व डीडीआरएफ पथक करत आहे. #boat #accident

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत