कुत्र्याचा पाठलाग करीत बिबट्या शिरला घरात. #Leopard


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
धानोरा:- वनपरिक्षेत्र उत्तर धानोरा अंतर्गत येणाऱ्या मोहली नियत क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मेटे जांगदा या गावी पहाटेच्या सुमारास कुत्र्याच्या शिकार करण्याकरिता पाठलाग करत बिबट्या चक्क घरात घुसल्याने गावात एकच खळबळ उडाली. #Leopard
प्राप्त माहितीनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या घरात घुसल्याने आतमध्ये असलेल्या वृद्ध महिलेने त्वरित आपला जीव वाचवत कसेबसे बाहेर पडून कुलूप लावले आणि बिबट्याला जेरबंद केले. या घटनेची माहिती गावातील लोकांनी कळताच एकच गर्दी केली.
बिबट्या घरात घुसल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. एवढेच नव्हे तर गडचिरोली तालुक्यात वाघांना जेरबंद करण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीम मागील सात दिवसांपासून वाघांच्या शोधात आहे. आता तीच टीम मेटे जांगदा येथे दाखल झाली. या टिमने बिबट्याची सुटका केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत