Click Here...👇👇👇

म. रा. मराठी पत्रकार संघाचे ना. वडेट्टीवारांना निवेदन सादर. #Bhadrawati

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे विविध मागण्यांसंदर्भात नुकतेच निवेदन सादर करण्यात आले.  #Bhadrawati
निवेदनात राज्यातील सर्व पत्रकारांना अधिस्वीकृतीधारक कार्ड देण्यात यावे, सर्व पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे, सर्व पत्रकारांना टोल टॅक्स माफ करण्यात यावा, कोरोना काळात मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
ना. वडेट्टीवार येथील काॅंग्रेस पक्ष प्रवेश व सरपंच सत्कार सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्याकरीता आले असता म.रा.मराठी पत्रकार संघाच्या पदाधिका-यांनी स्थानिक विश्राम गृहावर त्यांची भेट घेतली. यावेळी म.रा.मराठी पत्रकार संघाचे भद्रावती तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ना.वडेट्टीवार यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे, तालुका कार्यकारिणी सदस्य पवन शिवणकर आणि प्रदीप मडावी सहभागी झाले होते.