सावली तालुक्यातील अवैध रेतीचे उत्खनन बंद न केल्यास तीव्र आंदोलन करु. #Saoli #saolinews

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यात वैनगंगा नदी लागून असल्याने या नदीमधून फार मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. मागील दोन-तीन वर्ष शासनाचे कोणत्याही घाटाचे लिलाव झालेले नाही. परंतु साखरी व बोरमाळा या घाटातील मागील लीलावानुसार अजूनही तेच रेती लिलाव धारक जुना रेती साठा दाखवून कधी तहसीलदार कडून तर कधी उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्या मुदतवाढीचा आदेश घेऊन जुना रेतीचा साठा जशाच्या तशा ठेवून नदीपात्रातून जेसीपी व पोकल्यानच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा करून वाहतूक करीत आहे . या वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. या वाहतुकीमुळे व रस्त्याच्या खड्ड्यामुळे अनेक नागरिकांचे जीव गेलेले आहे. व जखमी सुद्धा झालेले आहे. #Saoli #saolinews
सदर अवैध रेतीचा उपसा हा बोरमाळा घाटापासून चंद्रपूर, नागपूर ,व तालुक्यातील मोठमोठ्या कंत्राटदारांना अवैद्य रेतिचा पुरवठा करीत असतात .यामुळे फार मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करून महसूल बुडत आहे.
        तरी याकडे प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत असे निदर्शनास आले आहे. करिता जर अवैध रेती वाहतूक बंद न केल्यास भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने .तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदारांना  देण्यात आला त्यावेळी उपस्थितअविनाश पाल अध्यक्ष भाजपा ता. सावली, अर्जुन भोयर कोषाध्यक्ष देवराव सा. मुदमवार, योगिता डबले सदस्या जि. प., प्रकाश पा.गड्डमवार,रवि बोलिवार,गणपतराव कोठारे प. स सदस्य,उप सभापती पं. स. सावली,छायाताई शेंडे,मा.सभापती,विनोद पा. गड्डमवार,विनोद धोटे,दिवाकर गेडाम, आशिष कार्लेकर,अशोक पा. ठिकरे, संचालक बाजार समिती सावली, प्रतिभा बोबाटे, जगदीश हेटकर, डाॅ धारणे, अरुण पाल, अनिल येनगंटिवार, मोतीराम चिमुरकर, किशोर वाकुडकर, जितेश सोनटक्के, रविंद्र बांबोळे, मोरेश्वर भोयर, बबनराव बोरसरे, आशिष भांडेकर,विशाल कंरडे  उपस्थित होते.