Top News

खड्ड्याने घेतला प्राध्यापकाचा जीव. #professor #accident #Death #potholes

ट्रकखाली आल्याने जागीच मृत्यू.
भंडारा:- राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात खाली पडून एका प्राध्यपकाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील जांभळी सड़क येथे घडली असून टालीकराम बहेकर असं मृत्यू झाल्येल्या प्राध्यापकाचं नाव आहे. प्राध्यापक ट्रकच्या मागील चाकात आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. #professor #accident #Death #potholes
खड्डा चुकविताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले....

मिळालेल्या माहितीनुसार मुंडीपार सडक येथील तिरुपती विद्यालय तथा स्वर्गीय निर्धराव पाटील वाघाये या कनिष्ठ महाविद्यालयात टाकीलराम बहेकर हे इतिहास विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. टालीकराम बहेकर कॉलेजचे काम आटोपून दुचाकीने निघाले होते. ते साकोली येथील त्यांच्या राहत्या घरी जात होते. यावेळी जांभळी सड़क येथील सराठी शिवारात महामार्गावरील खड्डा चुकविताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तसेच दुचाकी खाली पडल्यामुळे तेही रस्त्यावरच कोसळले. याचवेळी नागपूरहून रायपूरला जाणाऱ्या भरधाव ट्रकच्या मागील चाकात त्यांचे डोके आले. या दुर्दैवी अपघातात प्रोफेसर बहेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल.....

या घटनेची माहिती समजताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साकोली पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन हटवून मृतदेह रुग्णालयात पाठविला. तसेच ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला. या अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे एका अतिशय विनयशील आणि हुशार प्राध्यापकाचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खड्डे बुजण्याची प्रवाशांची मागणी....

दरम्यान, हा प्रकार घडल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने एका निष्पाप प्राध्यापकाच्या मृत्यू झाल्याची भावना नागरिक तसेच विद्यार्थी व्यक्त करत आहेत. तसेच सरकारने आतातरी रस्त्यांची दुरुस्ती करवी अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने