Top News

आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 'कुल जार'चे वाटप #chandrapur


चंद्रपूर:- विधिमंडळ लोकलेखा समिती आध्यक्ष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून महानगरातील गिरनार चौक ते गांधी चौक व गांधी चौक ते पाठणपुरा व जटपूरा गेट परिसरातील फुटपाथ व्यवसायिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिवसाचे औचित्य साधून रविवार 1 मे ला 'कुलजार 'वाटप करण्यात आले. 


यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(श) डॉ.मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महासचिव रवींद्र गुरनुले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,भाजपा नेते सचिन कोतपल्लीवार,राजेंद्र खांडेकर,रवी चहारे,गणेश रामगुंडेवार राहुल पाल,अमित निरंजने,राकेश बोमनवार,रामकुमार आक्केपल्लीवार,अरविंद कोलंनकर,रोशन माणुसमारे,विक्की मेश्राम,मोहन मंचलवार,मनीष खापरे,नकुल आचार्य,श्रेयस घरोटे श्याम बोबडे त्यांची उपस्थिती होती. प्रारंभी, डॉ गुलवाडे,धारणे व गांधी यांचे हस्ते गिरनार चौक व गांधीफूटपाथ व्यवसायिकांना कुलजार वितरित करण्यात आल्यावर मुख्य आपला मोर्चा,पठाणपूरा गेट कडे वळविला.शेकडो फूटपाथ व्यवसायिकांना हे जार देण्यात आले.

यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,आ सुधीरभाऊ यांच्याकडे पुढाकारातून हे जार देण्यात येत आहे.कोरोनाचे 2 वर्ष सोडून कुलजार वाटपाचे हे तिसरे वर्ष आहे.रखरखत्या उन्हाळ्यात हे जार फुटपाथ व्यवसायिकांसाठी वरदान ठरणार आहे,असे ते म्हणाले.उन्हात काम करतांना उपाशी राहू नका,भरपूर पाणी पिण्याचा सल्ला यावेळी डॉ गुलवाडे यांनी दिला.कुल जार लाभार्थ्यांमध्ये चंद्रपुर महानगरातील हातगाडी चालक,फुटपाथ वरील लहान व्यवसायिक,चर्मकार,फळ व भाजी विक्रेते यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने