Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

सुदाम राठोड यांनी आत्महत्या ग्रस्त पीडित कुटुंबियांची घेतली भेट #Jivati


आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबियांना शासनाने तात्काळ पाच लाखाची आर्थिक मदत द्यावी-सुदाम राठोड
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यात काल पुन्हा एक शेतकरी आत्महत्या तालुक्यातील तेलंगाणा सीमेलगत असलेल्या नारायणगुडा येथील शेतकरी माधव जळबा वाघमारे वय ६० वर्षे यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याच्या आत्महत्येचा जबाबदार शासन आहे असा आरोप जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी केले आहे,कारण जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही व कोणतीही सबसिडी त्यांना मिळत नाही कारण त्यांच्या कडे जमीन तर आहेच पण त्यांच्या मालकीच्या जमिनीचे त्यांच्या हक्काचे जमीन पट्टे त्यांच्याकडे नाही आहे, मग हा शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार? एकतर खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन त्यांना जगावं लागत व शेती करावं लागतं वरून शासन शेतमालाला बरोबर भाव नाही देत वरून निसर्गाचा मार, मग हे शेतकरी करणार तरी काय? जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी शासनाला विनंती केली आहे की पीडित कुटुंबियांना पाच लाखाची आर्थिक मदत तात्काळ मंजूर करून द्यावी व पुन्हा जिवती तालुक्यातील शेतकरी बळी न जावे यासाठी सर्वे करून शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करावे अशी विनंती केली आहे.यावेळी जय विदर्भ पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष रियाजभाई सय्यद, जिवती शहर प्रमुख विनोद पवार, सोशल मीडिया प्रमुख विशाल राठोड व नारायणगुडा येथील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत