जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थींनींचा बामनवाडा येथे जाहिर सत्कार.

ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थींनींचा बामनवाडा येथे जाहिर सत्कार

विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्याच्या हेतूने यशस्वी विद्यार्थ्यांच्या गावात सत्कार

सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर चा स्तुत्य उपक्रम


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
राजुरा - सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या गावात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने सत्कार समारंभाचे आयोजन राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे करण्यात आले होते.  सर्वोदय शिक्षण मंडळाच्या या नाविण्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सर्वोदय शिक्षण मंडळाच्या वतीने राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत उत्तीर्ण बामनवाडा येथील कु. ललीता ताराचंद टाकभौवरे-करमनकर आणि चंद्रपूर येथील कु. निकिशा अशरफ खाँ पठाण यांचा जाहिर सत्कार मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपिठ नागपूर चे न्यायीक सदस्य मुर्लीधरराव गिरडकर यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तथा राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख अतिथी म्हणून राजुरा चे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, सर्वोदय शिक्षण मंडळा चे सचिव प्रशांत पोटदुखे, राजुरा बार असोसिएशन चे अध्यक्ष निनाद येरणे, राजुरा येथील ॲड. अरूण धोटे, ॲड. सदानंद लांडे, सिद्धार्थ पथाडे, अविनाश जाधव, डॉ. सत्यपाल कातकर, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी वारकड, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, बामनवाडा चे सरपंच भारती पाल, उपसरपंच अविनाश टेकाम, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजली हस्तक, मिलींद संजोग मंडळ बामनवाडा चे अध्यक्ष आक्रोश जुलमे, रमाबाई महिला मंडळ बामनवाडा चे अध्यक्ष मायाबाई वाघमारे, मुख्याध्यापक अविनाश गुरमुखी, विजय पाटील, रामदास गिरडकर, राजकुमार डावर, बंडू नगराळे, नंदकिशोर माहोरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंजली हस्तक  यांनी संचालन, काजी मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामदास गिरडकर यांनी मानले.
याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपिठ नागपूर चे न्यायीक सदस्य मुर्लीधरराव गिरडकर, बार असोसिएशन चे अध्यक्ष निनाद येरणे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतल्या यश पदरी पडण्यास वेळ लागणार नाही अशा भावना व्यक्त करीत विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहीत केले. याप्रसंगी ग्राम पंचायत चुनाळा च्या वतीने सरपंच बाळनाथ वडस्कर व सदस्यांनी यश प्राप्त केलेल्या दोन्ही विद्यार्थीनींचा सत्कार केला.
मान्यवरांचे स्वागत शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे व स्वागतगिताने केले. यानंतर निळी पहाट चंद्रपूर द्वारा प्रस्तुत बुद्ध भिमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.  बामनवाडा येथील छोट्याशा गावातील  व गरीब कुटूंबातील मुलीचा जाहिर सत्कार त्यांच्याच गावी जाऊन केल्याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत