Click Here...👇👇👇

संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी कुंभार समाज बांधावा तर्फे साजरी #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी संत गोरोबा काका कुंभार समाज मंदीर चंद्रपूर येथे कुंभार समाज बांधावा तर्फे साजरी करण्यात आली. या निमित्य भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्च्या चंद्रपूर जिल्हा (महानगर) चे पदाधिकारी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजप महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रवि गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भा.ज.यु.मोर्च्या उपाध्यक्ष यश बांगडे, भा.ज.यु.मोर्च्या सचिव सतिश तायडे, (मध्य)बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, रामकुमार आक्केपल्लीवार, राकेश बोमनवार, मोहन मंचलवार, अमित निरंजने, ऐश्वर्य बांगडे नगरसेविका जुमडे, गुरनुले इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आणि प्रभागातील नगरसेवकांचे कुंभार समाज मंदीर चंद्रपूर, इथे भेट देऊन संत गोरोबा काकांच्या मुर्ति ला माल्यर्पण करुन पुजा अर्चना करण्यात आले आणि कुंभार समाज बांधवांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ व शालश्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व प्रमुख पाहुणे यांचे आभार मानले.