जाहिरात... Advertisement... विज्ञापन

महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती पोंभुर्णा येथे ध्वजारोहण pombhurna

पोंभुर्णा:- १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण धनंजय साळवे गट विकास अधिकारी तथा प्रशासक पंचायत समिती पोंभूर्णा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सभागृहात आज बार्टी पुणे अंतर्गत विविध उपक्रमांच्या घडी पुस्तिकेचे अनावरनही करण्यात आले. पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात ही विशेष बाब आहे आणि या उपक्रमाव्दारे अभ्यागतांना योजनांची माहिती पोहोचवावी व लाभ घेता यावा असा हेतू ठेवून संपूर्ण पंचायत समिती कार्यालय रंगरंगोटी करून, तसेच अभिनव वाचनालय निर्माण करून, कार्यालय स्वच्छ आणि सुंदर केलेले आहे. कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत म्हणून लवकरच जिल्हा स्तरावरून पुरस्कार प्राप्त होईल असेही आपल्या भाषणात गट विकास अधिकारी बोलत होते.


त्या वेळी मंचावर उपस्थित सौ. माशिरकर शिक्षणाधिकारी, श्री. लाढे एबायो अधिकारी, श्री.सहस्रबूद्धे सहाय्यक लेखा अधिकारी, श्री.वाढई स.प्र.अ.कू., रश्मी पुरी कप्रअ, मोरेश्वर वाकडे समतादुत, व पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत