Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

पोंभुर्णा आदिवासी विवीध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत किसान विकास सहकार आघाडीचा दणदणीत विजय #pombhurna


पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील बहुचर्चीत आणि अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. पोंभुर्णा च्या निवडणुकीत किसान विकास सहकारी आघाडी ने विरोधकांना चारी मुड्यां चित करीत 12 पैकी 12 जागांवर यश प्राप्त करुन दणदणीत विजय मिळवीला आहे.

12 पैकी 7 ऊमेदवार हे अविरोध निवडनु आले होते. उर्वरीत 5 जागेकरीता निवडणुक घेण्यात आली होती. सर्वसाधारण बिगर आदिवासी कर्जदार गटामधुन रूषी मारोती कोटरंगे आणि पराग बाळासाहेब मुलकलवार, अनुसुचीत जाती / जमाती गटामधुन ओमेश्वर बबनराव पद्मगीरीवार, ईतर मागास गटामधुन ईश्वर बुधाजी नैताम, विमुक्त जाती /भटक्या जमाती गटामधुन दिलीप मारोतराव मॕकलवार हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत.

या निवडनुकित संपुर्ण तालुक्याचे नव्हे तर जिल्हाचे लक्ष लागुन होते. मतदारांनी महाविकास आघाडी ला धोबीपछाड दिला. मतदारांनी किसान विकास सहकार आघाडीला एक हाती पुर्ण सत्ता मिळवुन दिली.

या निवडणुकित माजी जि. प. सदस्य राहुल संतोषवार , उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार , कृ.ऊ.बा.स.माजी संचालक नंदकिशोर तुम्मुलवार, महादेव सोमनकर, हरीचंद्र मडावी, शामराव गद्देकार, राकेश कुंभरे, प्रकाश वडस्कर यांनी अथक परीश्रम घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत