Chandrapur News: चंद्रपूर महानगरपालिकेत "हायव्होल्टेज ड्रामा"

Bhairav Diwase
महापौरांनी केली 'स्थायी समिती'च्या १६ सदस्यांची घोषणा!
चंद्रपूर:- चंद्रपूर महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 'स्थायी समिती'च्या १६ सदस्यांच्या नावांची घोषणा आज महापौरांनी सभागृहात केली. चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात आजचा दिवस वादळी ठरला. स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नावे जाहीर होताच सभागृहात गोंधळ उडाला.

काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या ७ जागांवर पूर्णपणे वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांनी बाजी मारली आहे. यामध्ये वसंता देशमुख, सचिन कत्याल, राजेश अडूर, संजीवनी वासेकर, चंदा वैरागडे, सोफिया तवंगर आणि विनोद लभाने यांची वर्णी लागली आहे.


भारतीय जनता पक्षाने सावध पवित्रा घेत आपल्या ६ अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये सुभाष कासनगोट्टूवार, संजय कंचर्लावार, पुष्पा उराडे, सारिका संदूरकर, प्रज्वलंत कडू आणि सविता सरकार यांचा समावेश आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) कडून मनस्वी गिऱ्हे, श्रुती घटे आणि शेकाप कडून प्रदीप देशमुख यांची स्थायी समितीवर निवड करण्यात आली आहे. यावेळी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनुरी नरेश उपस्थित होते.