दुर्गापुरात बिबट्याच्या हल्ल्यात 45 वर्षीय महिला ठार #Tiger #tigerattack


दुर्गापूर :- मागील काही महिन्यांपासून उर्जानगर व दुर्गापूर भागात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीत जीवन जगत आहे. अनेक नागरिकांचा जीव घेणारा बिबट व वाघ आजही त्या क्षेत्रात वावरत आहे, 16 वर्षीय राज असो की 8 वर्षीय प्रतीक बावणे या दोघांना घराजवळ बिबट्याने हल्ला करीत ठार केले होते.
मध्यंतरी एका बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले होते मात्र आता पुन्हा नरभक्षक बिबट परत आला असून त्याने 1 मे ला दुर्गापूर वार्ड क्रमांक 3 येथील 45 वर्षीय मेश्राम नामक महिलेला रात्री 12 वाजेदरम्यान घराजवळ बिबट्याने हल्ला करीत ठार केले.
वनविभागाने जेरबंद केलेला बिबट नरभक्षक होता की तो दुसरा होता यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, पुन्हा तो नरभक्षक परत आल्याने नागरिकही दहशतीच वातावरण आहे.
वनप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी वन्य प्राण्यांच्या हल्या पासून मुक्त वहावे यांसाठी आंदोलन केले आणि प्रशासन योग्य कारवाई करत नाही म्हणून आपला वेकोली कार्याल्यावर रोष ही व्यक्त केला.त्यांनी दुर्गापूरवासीयांना धीर देत पुन्हा असे हल्ले होणार नाही याबाबत कठोर पाऊले उचलावी लागणार असे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत