Top News

कामगार मंडळात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करून बांधकाम कामगारांना न्याय द्यावा #chandrapur #pombhurna


शिवराज्य आयटिआय विद्यार्थी कामगार संघटनेचे कामगार आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन
चंद्रपूर:- कामगार मंडळ विभागांतर्गत बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या योजना देऊन त्यांचे जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण् या प्रयत्नांना कुठेतरी हळताल फासल्याचा प्रकार होताना दिसुन येत आहे. जिल्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यात यावे यासाठी शिवराज्य आयटिआय विद्यार्थी कामगार संघटना तर्फे आयुक्त कामगार मंडळ / जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कामगार हा समाजाचा एक कणा आहे.त्यांच्या जीवावर समाजातील अन्य घटक अवलंबून असतात.जर अशा घटकांसाठी शासनाने जर काही योजना सुरू केल्या ति बांधकाम कामगारांना पर्यंत पोहचने अनिवार्य आहे.
मागच्या एक ते दीड वर्षापासून प्रलंबित असलेले रजिस्ट्रेशन फॉर्म ला अजुनही मॅसेज टाकण्यात आले नाही , ते लवकरच टाकण्यात यावे. वेबसाईट मधील अडचणी दूर करण्यात याव्यात.
संपूर्ण भरलेले फार्म रिजेक्ट केले जात आहेत, ते एक्सेप्ट करण्यात यावे, चंद्रपूर जिल्ह्यासाठी फार्म चेक करणारे अधिकारी (R O) देण्यात यावे.कामगारांना जेवण मिळते कि नाही याची चौकशी करण्यात यावी. मनरेगा अंतर्गत चालू असलेलं जेवन बंद झाले असून त्या गावातील बिले निघत आहेत काय याची चौकशी करण्यात यावी. आरोग्य तपासणी चा लाभ खरच कामगारांना होत आहे का याची चौकशी करण्यात यावी यासर्व मागण्या समस्या सोडविण्यात यावा अशी मागणी शिवराज्य आयटिआय विद्यार्थी कामगार संघटनेने निवेदनात केली आहे.
निवेदन देताना अविनाश वाळके, सुरेश नारनवरे,अमोल बावने,देव मडावी, प्रशांत दुर्गे, लोमेश गोंरंतवार, निश्चल भसारकर,हेमंत उराडे,अक्षय बांबोळे,देवा मानकर,जिवन कुंभरे,आशिष झाडे, प्रशांत गोंगले,प्रमोद कुंभरे,प्रमोद निखारे, सुनिल कावटवार यासह असंख्य बांधकाम कामगार, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने