Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गडचांदूर शहर बनले समस्याचे माहेरघर..... Gadchandur city has become the home of the problem.....


छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याची दुरवस्था; नगरपरिषदेचे मात्र दुर्लक्ष?
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील मोठी नगर परिषद म्हणून ओळख असलेले गडचांदूर शहर मात्र समस्याचे माहेरघर बनले आहे. वार्डावार्डातील रस्त्यांची अवस्था चिखलमय झाली असून खड्डे इतके झाले आहेत की रस्ता शोधणे अवघड झाले आहे. खड्यात पाणी साचल्यामुळे पायी चालणाऱ्या व बाईकने ये-जा करणाऱ्या माणसांना सुद्धा अवघड झाले आहे.
हा रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आहे. याच रस्त्याला महात्मा गांधी महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना पण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यांवर खड्डे पडले, पण नगर परिषद मात्र कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. त्यात दूचाकी वाहनास व पायदळ चालनाऱ्याना तर तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे भरपूर झाल्यामुळे कोणता खड्डा चुकवावा हे समजण्यास अवघड झाले आहे खड्डे युक्त रस्त्यावर पाणी येवढे झाले की रस्ता दिसेनासा झाला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाहक बळी पडण्याची शक्यता आहे.
नगर परिषद प्रशासन व नगर सेवक कधी लक्ष देणार की नाही? असा प्रश्न गडचांदूर रहिवासी करीत आहे. या चौकातील रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत