Click Here...👇👇👇

भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी #pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील अनेक गावांना जबरदस्त फटका बसला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेुसार तसेस भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजपा पोंभूर्णा चे पदाधिकारी यांनी अनेक गावांना भेटी देवून तिथे राहणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

दिनांक ३०/०७/२०२२ ला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त "भव्य मोफत रोग निदान, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप व महाआरोग्य तपासणी शिबिर" ग्रामीण रुग्णालय, पोंभूर्णा येथे असल्याबाबत माहिती देण्यात आली.
सर्वप्रथम देवई येथे अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या घरांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी करण्यात आली. त्यांनतर जुनगाव येथे पडझड झालेल्या घरांची पाहणी करण्यात आली आणि मारोती भोनू चुदरी यांचे घर राहण्यायोग्य नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तात्पुरतं राहण्याकरिता जिल्हा परिषद शाळा, जुनगाव येथे व्यवस्था करण्यात आली. घोसरी येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण मोतीराम गेडाम यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी कुमारी अल्का आत्राम जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, श्री. विनोद मारोती देशमुख माजी उप-सभापती, पंचायत समिती पोंभूर्णा, श्री. रोशन ठेंगणे उपाध्यक्ष, भाजयुमो पोंभूर्णा, श्री. गजानन मडपुवार, इंजि. वैभव पिंपळशेंडे सदस्य, ग्रामपंचायत चेकठाणेवासना उपस्थित होते.