'स्मार्ट सिटी' ? नव्हे ....हे तर पाण्यावर तरंगणारे शहर.

  रोखठोक
*************
प्रा. महेश पानसे.
विदर्भ अध्यक्ष
राज्य पत्रकार संघ.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
मुल:- स्मार्ट सिटी ' म्हणून कागदावर
कोरल्या गेलेल्या चंद्रपूर जिल्हयातील मूल शहराची खरी ओळख पाण्यावर तरंगणारे नगर अशी होत आहे असं म्हंटल्यास वावगे ठरू नये. आता इथेही पर्यटनाला भरपूर वाव राहील व भविष्यात नगरसेवकांना व कार्यकर्त्यांना बोटींग, बोर्डिंग, लॉजिंग चे ठेके देण्याची प्लॅनिंग तर नाही ना? हा सवाल उपस्थित होत आहेच. सवाल उपस्थित होण्याला भक्कम कारणही आहे. गत महिनाभरात मूल शहर अनेकदा पाण्यावर तरंगताना दिसले आहे. या स्मार्ट शहरातील् दुर्गा माता मंदिर, शहरातून गेलेला महामार्ग, शिक्षक वसाहती, व्यापारी प्रतिष्टाने सारे कसे पाण्यावर तरंगताना दिसले. झकास फोटोसेशन सुर होते. महसूल विभागाने ८०० घरांची तशी नोंद करून यावर शिक्कामोर्तबतही केले आहे. आता मूल शहराला पाण्यावर तरंगणारे शहर समजायला काही हरकत नाही.


      मूल शहराला पाण्यावर तरंगविण्याची कुठलीही कसर ना बांधकाम विभाग, ना सिंचाई विभाग ना वनविभागाने ठेवलेली दिसत नाही. नगरपालिकेने ध्रुतराष्ट़ाची भूमिका तेवढी पार पाडली.
    सिंचाई विभागाने दुर्गा मंदिरामागे असलेल्या तलाव निर्मिती मध्ये एवढी अक्कल पाझळवली. तळ्याबाहेर पाणी निघणार नाही व अख्या दुर्गा मंदीर परिसर व शहरातून जाणारा महामार्ग्  पाण्यात तरंगून संपुर्ण पावसाळाभर येणाऱ्या जाणाऱ्यांना फोटोसेशन करण्याची सोय होईल याची पुरेपूर काळजी घेतली. तसेही सुंदरीकरण या हेडखालीच तळ्याचे काम होत आहे. पाणी अडवा गाव बुडवा हेच धोरण ठरलेले दिसते. महामार्ग बांधकाम विभागाने जपान टेकनीक वापरून सारे गावातले पाणी महामार्ग ओलांडून न जाण्याची
सोय करून जेवढा परीसर पाण्यात तरंगेल तेवढी व्यवस्था करून मोठा हातभार लावला दिसेल.
   यात वनविभाग मागे कसा राहील? कर्मवीर महाविद्यालय लगतच्या झुडपी जंगल परिसरातील जेवढे जास्त पाणी ईकडे वळविता येईल तेवढे वळवून शहर पाण्यात तरंगवायला मोठे सहकार्य केले आहे. महसूल वाल्यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या घरवाल्यांना झटपट ५ हजाराची भिक देऊन जागते रहोची मुनारी दिली आहेच.
    आता टेंशन नाही, घंटाभर पाणी आले तरी शहर तरंगते. घरात व घराबाहेर पाणी भरलेले हजारो नगरवासी पाण्यावर फिरणारे साप, बेडूक, किडेमाकोडे बघून या शहरातील दुदैवी आयुष्यावर अश्रू ढाळतात. दुसरीकडे सात्वंना देणारे अधिकारी, नेते, कार्यकर्ते धान्याची किट, धनादेश देण्याची नौटंकी करून झकास फोटोसेशन करून कदाचीत.... भाऊ! पर्यटनास चालना देणारी योजना आणायची का? असा सल्ला देत असतील. (क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत