Top News

चंद्रपूर शहरात पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रिय #chandrapur

चोरी करणाऱ्याचा लवकर बंदोबस्त करा; छत्रपती नगरवासीयाने दिले पोलीसांना निवेदन
चंद्रपूर:- स्थानिक छत्रपती नगर परिसरात मागील १५ दिवसात दोनदा बऱ्याच चारचाकी वाहनातून पेट्रोल चोरी झालेले आहे. याचाच अर्थ हे काही एक दोघाचे काम नसून हि एक पेट्रोल चोरणारी टोळी चंद्रपूर शहरात सक्रिय झालेली आहे. खास करून छत्रपती नगरात, (राधेशाम मंदिर, एकता गणेश मंडळ, हनुमान मंदिर ) या एकाच वार्डात १५ दिवसात अनेक वाहनातून पेट्रोल चोरी होणे हि अत्यंत गंभीर बाब आहे. हि ५ ते ६ जनाची टोळी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. चारचाकी वाहनांचे खालच्या भागातून पेट्रोल पाईप कापून त्यातून पेट्रोल काढल्या जाते.
 साधारण रात्री २ ते ४ च्या दरम्यान ही चोरी केली जात असावी जेव्हा नागरिक गाढ झोपेत असतात. त्यामुळे ज्या वाहनधारकाचे वाहनाचे पेट्रोल चोरून नेल्या गेलेले आहे. त्यांना नाहक मानसीक त्रासाला व आर्थीक नुकसानाला समोर जावे लागत आहे. तसेच या टोळीपासून नागरिकांच्या जिवालासुध्दा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 यासाठी पोलिस निरीक्षक रामनगर यांना निवेदना मार्फ़त सांगण्यात आले की स्थानिक छत्रपती नगरात गस्त लावून या पेट्रोल चोर टोळीला जेरबंद करावे व स्थानिक नागरीकांना सुरक्षितता यावी.
यावेळी निवेदन देताना राकेश नाकाडे ,विनोद एडलावार, सचिन चलकलवार, सुमित करपे, पवन कन्नमवार, बादल गोरलावार, अमित बिंकलवार आदी छत्रपती नगर वासीय उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने