Click Here...👇👇👇

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत न. प. राजुरा कार्यालय तर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरुवात #Rajura

Bhairav Diwase

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न

महिला बचत गटामार्फत होणार ध्वज विक्री.
राजुरा भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची भावना कायम स्वरूपी तेवत राहावी आणी आपल्या इतिहासातील हुतात्म्याचे स्मरण व्हावे यासाठी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत नगर परिषद कार्यालय राजुरा तर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
" हर घर तिरंगा अभियान " संपूर्ण नगर परिषद राजुरा क्षेत्रात राबविण्याचे नियोजन करण्यात आले. शासनाच्या सूचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. नगर परिषद राजुरा तर्फे महिला बचत गटामार्फत राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन अजय गुलाने,जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी राजुरा, हरीश गाडे तहसीलदार राजुरा, सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा, भिंगारदिवे, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती,राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उंचाविणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार जांभूळकर, प्रशासकीय अधिकारी न. प.राजुरा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांनी तर आभार संकेत नंदवंशी, पाणीपुरवठा अभियंता यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आदित्य खापणे, विद्युत अभियंता, उपेंद्र धामंगे, कर निरीक्षक, अश्विनकुमार भोई लेखापाल अभिनंदन काळे रचना सहाय्यक रवींद्र जामूनकर स्थापत्य अभियंता प्रीतम खडसे, सनप जोशी, अक्षय सूर्यवंशी मिळकत व्यवस्थापक आदीसह नगर परिषद कार्यालय राजुरा येथील सर्व कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.