राजुऱ्यात दुमदुमला "भारत माता की जय " चा जयघोष #Rajura.

Bhairav Diwase
शरातील शाळा, महाविद्यालयाचे शेकडो विध्यार्थी प्रभात फेरीत झाले सहभागी

हर घर तिरंगा प्रभात फेरीचे न. प. द्वारे यशस्वी आयोजन
राजुरा:: संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्यप्राप्ती ला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दि.13 ते 15 ऑगस्ट पर्यंत " हर घर तिरंगा " तसेच दि. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान "स्वराज्य महोत्सव "राबवायचे आहे. या अंतर्गत राजुरा शहरातील शाळा, महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालयांच्या शेकडो विध्यार्थीनी " हर घर तिरंगा " जनजागृती प्रभात फेरीत सहभागी होऊन भारत माता की जय च्या जयघोषाने राजुरा शहर दुमदुमले.
राजुरा नगर परिषद कार्यालय येथून निघालेल्या प्रभात फेरीचा समारोप तहसील कार्यालय येथे राष्ट्रगीत गायनाने झाला. यावेळी हरीश गाडे, तहसीलदार राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, छोटूलाल सोमलकर, स्वच्छता दूत, संदीप जैन, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, राजुरा शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल, शिवाजी हायस्कुल, इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक स्कूल, कल्याण नर्सिंग कॉलेज, श्रीमती गोपिकाबाई सांगडा पाटील आश्रम शाळा, ऍड. यादवराव धोटे महाविद्यालय, नगर परिषदेच्या विविध प्राथमिक शाळा, राष्ट्रीय नर्सिंग कॉलेज, सर्व शाळाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.


या प्रभातफेरीचे सूत्रसंचालन विजयकुमार जांभूळकर, प्रशासकीय अधिकारी न. प.राजुरा यांनी केले. ही प्रभातफेरी सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली. संकेत नंदवंशी, पाणीपुरवठा अभियंता, आदित्य खापणे, विद्युत अभियंता, उपेंद्र धामंगे, कर निरीक्षक, अश्विनकुमार भोई लेखापाल अभिनंदन काळे रचना सहाय्यक रवींद्र जामूनकर स्थापत्य अभियंता प्रीतम खडसे, सनप जोशी, अक्षय सूर्यवंशी मिळकत व्यवस्थापक, उपस्थित होते. या सर्व प्रभातफेरी च्या यशस्वितेकरिता पोलीस प्रशासन राजुरा , नगर परिषद कार्यालय राजुरा, तहसील कार्यालय, राजुरा, वनविभाग कार्यालय राजुरा , व्यापारी असोसिएशन, पंचायत समिती कार्यालय, राजुरा, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तथा सदस्य , नेफडोचे पदाधिकारी सदस्य यांचे सहकार्य लाभले. प्रभातफेरीच्या शेवटी उपास्थित सर्वांना नगर परिषद तर्फे बिस्कीट वितरण करण्यात आले.