🌄 💻

💻

विरूर स्टेशन तालुका घोषित करा #chandrapur #Rajura


भाजयुमो जिल्हा संयोजक हितेश गाडगे यांची मागणी
राजुरा:- तालुक्यातील सर्वात मोठे गाव व परिसरातील सर्वात मोठे बाजारपेठ असलेले विरुर स्टेशन हे गाव अनेक वर्षांपासून प्रशासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात उपेक्षा झेलत आहे.
प्रशासकीय दृष्ट्या बघितल्या गेल्यास राजुरा तालुका मुख्यालयापासून वीरुर स्टेशन हे गाव साधारणता ३० कि.मी. अंतरावर आहे तसेच अंतरगाव सारखी गावे व जंगल क्षेत्रात बसलेली दुर्गम गावे ही राजुरा तालुका मुख्यालयापासून 60 ते 65 कि.मी. अंतरावर आहेत. त्यामुळे साध्यासुध्या प्रशासनिक कामासाठी सुद्धा नागरिकांना दररोज १०० कि.मी. फेरा मारावा लागतो. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन पोलीस प्रशासन व वन विभागाने आपली कार्यालय वीरुर स्टेशन येथे ठेवलेली आहे.
त्याचबरोबर पटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा कार्यालय देखील विरुर येथे आहे. परंतु यांची तालुकास्तरीय कार्यालय ही राजुरा येथे असल्याने जरी ही कार्यालय विरुद्ध असली तरी येथील अधिकारी मोठ्या प्रमाणात राजुरा कार्यालयातूनच आपला कारभार चालवतात किंवा या कार्यालयात बदली घेण्यास तयार नसतात त्यामुळे नागरीकांना वारंवार आपल्या कामासाठी राजुरा गाठावे लागतो. तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी हे वीरूर व परिसरातील मुख्यालय न राहता राजुरा येथून आपल्या गोट्या हलवत असतात त्यामुळे परिसरातील तस्करांचे भावत आहे एवढा पर्यटन पूरक नैसर्गिक सौंदर्य नटलेला असलेला हा परिसर भकास होऊन राहिलेला आहे व हे गाव पूर्ण तेलंगाना व महाराष्ट्रात फक्त तस्करीसाठी प्रसिद्ध झालेले आहे.याचे तात्पर्य बघायचे झाल्यास वन विभागाचे अधिकारी मुख्यालय राहत असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात वनतस्करी विरुद्ध मोहिमा हाती घेऊन यशस्वीपणे राबविल्या आहेत. विरुर तालुका घोषित झाल्यास इतरही होणाऱ्या तस्करीला धरबंद घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनिक अमला मिळू शकेल.
शैक्षणिक दृष्ट्या बघायला गेल्यास विरूर स्टेशन येथे एक महाविद्यालय दोन ज्युनिअर कॉलेज देखील आहे त्यामुळे परिसरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी येथे येतात परंतु तालुक्याचे ठिकाण नसल्यामुळे येथे औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण मिळत नाही ही खंत विद्यार्थ्यांच्या मनात कायम आहे. तांत्रिक औद्योगिक प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना दररोज 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो त्यामुळे तालुका झाल्यास या प्रकारच्या तांत्रिक संस्था देखील उपलब्ध होतील
तसं बघायला गेलास परिसर परिसरातील बहुतांशी लोकांचा जीवनमान हे शेती व शेती पूरक व्यवसायांवर अवलंबलेले आहे आज स्वातंत्र्याला 75 पूर्ण होत असताना जेव्हा चंद्रपूर जिल्हा पूर्णपणे औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे तरी देखील विरूर् परिसरात अजूनही मागास अजूनही आलेले आहे.
विरुर स्टेशन इथली बाजारपेठ हे खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असून रेल्वे व रस्ते मार्गामुळे विरुर शहर पूर्णपणे तेलंगणाशी जोडले गेलेले आहे व तेलंगाना राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी विरुद्ध येतात तसेच गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव व लाठी परिसर हा देखील पूर्णपणे विरुरशी जोडलेल्या गेलेला आहे व त्यांना देखील गोंडपीपरी पेक्षा विरूर हेच गाव जवळचे पडते.
अशा एक ना अनेक कारणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून राजुरा तालुक्यातील देवडा, टेबुर्वाही, विहीरगाव,विरुर मंडळे तसेच गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव व लाठी ही मंडळे एकत्र करून स्वतंत्र वेळ तालुका घोषित करावा अशी मागणी वेळोवेळी उठत राहिलेली आहे. त्यातच महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रात लवकरच नवे तालुके व जिल्हे निर्माण केले जातील असे म्हटले आहे. तरी विरुर अतीदुर्गम व शेवटच्या टोकावरील परिसराला लवकरात लवकर तालुका म्हणून घोषित करावे अन्यथा १५ ऑगस्ट नंतर तीव्र व उग्र जनांदोलनाचा इशारा भाजपा जिल्हा संयोजक श्री हितेंद्र गाडगे यांनी दिलेला आहे. व यासंबंधी आणि उपमुख्यमंत्री साहेबांना या आधीच पत्र दिले असून त्यांनी यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहेत. तरी उपविभागीय कार्यालयाने त्याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवणे अपेक्षित आहे असे न झाल्यास विरूर तालुका संघर्ष समिती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात इशारा भाजयुमो. जिल्हा संयोजक श्री. गाडगे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत