💻

💻

दोन बॅंकांत चोरीचा प्रयत्न फसला #chandrapur #bhadrawati #Bank
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील चोरा येथील दोन बॅंकांवर अयशस्वी दरोडा पडण्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दि.४ ऑगस्टच्या रात्री २.३० वाजताच्या सुमारास चोरा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यालय व एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच याच बॅंकेच्या जवळ असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडून कॅशिअरची कॅबीन फोडण्यात आली. परंतु तेथे दरोडेखोरांना रक्कम आढळून आली नाही. दोन बॅंका व एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, दरोडेखोर चोरीचा प्रयत्न करीत असतानाच अचानक एका चारचाकी वाहनाने काही युवक तेथे आले असता बॅंकेचे शटर खुले दिसले. म्हणून त्या युवकांनी जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता एक दरोडेखोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेतातून पळून गेला. हे युवक नेरी येथून सवारीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत आले होते. दरोडेखोरांकडे शस्त्रे असावीत या भीतीने कोणीही दरोडेखोरांच्या मागे धावण्याची हिंमत केली नाही.
या घटनेची भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, दरोडेखोराची छत्री, पॅन्ट आणि पेंचीस बांदुरकर यांच्या बंड्यात आढळून आली आहे. त्यावरुन तपास केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत