💻

💻

जहाल महिला नक्षलवादीला अटक #arrested

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
एटापल्ली:- नाकाबंदी करून जहाल महिला नक्षलवादी मुडे हिडमा मडावीला अटक करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे. दंडकारण्यात नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पुकारला होता. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती.
एटापल्ली येथे ४ ऑगस्ट रोजी एका महिलेची कसून चौकशी केली असता तिच्याकडे आक्षेपार्ह साहित्य मिळून आले. ती नक्षलवादी असल्याचे समोर येताच तिला अटक करण्यात आली. कसनसूर दलम मध्ये ती सक्रिय होती.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक गोयल यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत