Top News

पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला नक्षल्यांचा घातपाताचा डाव #gadchiroli


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
गडचिरोली:- गडचिरोली जिल्हा हा राज्यातील नक्षलवादी घडामोडींचं केंद्र मानला जातो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. याच शहीद सप्ताहादरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. कुरखेडा तालुक्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या हेटळकसा जंगलात नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटकं सामुग्री पोलीस दलाने शोधून काढली आहे.
विशेष अभियान पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या जवानांना गस्ती दरम्यान हे मोठे यश मिळाले आहे. पथकाने 500 लिटरच्या पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाकीत स्फोटके - इलेक्ट्रिक वायर आणि अन्य नक्षल सामग्री दोन कूकरसह जमिनीत पुरून होती. त्यापैकी एका स्फोटक भरल्या कुकरचा जवानांनी जंगलातच नियंत्रित स्फोट केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करत अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात शोध अभियान सुरू करण्यात आले आहे.
नक्षली जंगलात घातपात घडविण्याच्या उद्देशाने याकाळात खरेदी केलेली स्फोटके गोपनीय जागी पुरून ठेवतात. कालांतराने हीच स्फोटके सुरक्षादलांना लक्ष्य करून उडवली जात असल्याने या जप्तीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या कारवाईचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने