चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवारांना स्वीय सहाय्यकाचा धक्का
चंद्रपूर:- निवडणुकीच्या रणधुमाळीत आता सत्ताधारी भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. एकोरी प्रभाग क्रमांक १० मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या दीपा ललित कासट यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक ललित कासट यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला? त्यांचं म्हणणं आहे की, 'आम्ही प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केलं, पण पक्षाने आमच्या कामाची दखल घेतली नाही.' निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतर नावांचा विचार झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच नाराजीतून आता त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे .
प्रभाग क्रमांक १० मध्ये दीपा कासट यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या बंडखोरीचा फटका कोणाला बसणार आणि मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

