चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी 'शिवशक्ती आणि भीमशक्ती' एकत्र आली असून, जागा वाटपाचा सर्वात मोठा फॉर्म्युला जाहीर झाला आहे!
काँग्रेस आणि वंचितच्या युतीची चर्चा सुरू असतानाच, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उबाठा गटाने सर्वांना धक्का दिला आहे. वंचितचे महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली.
या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी 'फिफ्टी-फिफ्टी' जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला आहे. यामुळे आता शहरातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार असल्याचे चिन्हे आहेत. पडद्यामागील वेगाने हालचालींनंतर झालेली ही युती, प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे करणार का? आणि या युतीचा काँग्रेसच्या रणनीतीवर काय परिणाम होणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

