भद्रावती:- भद्रावती शहरातील प्रसिद्ध जैन श्वेतांबर मंदिरात दानपेटी फोडून १० हजार रुपये चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना cctv कॅमेरामध्ये कैद झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. शुभम झाडे व ऋतिक जांभूळकर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसी चौकशीत दोघांनीही चोरीची कबुली दिली.
शहरातील प्रसिद्ध जैन श्वेतांबर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात ठेवण्यात आलेल्या दानपेटीतून दहा हजार रुपयांची रोकड चोरीस गेली. सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी आले असता दानपेटीत रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकांना माहिती दिली.
यानंतर व्यवस्थापकांनि भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयावरून शुभम झाडे व ऋतिक जांभूळकर यांना ताब्यात घेतले. दोघांनीही चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

