अंद्धश्रद्धेचा बळी! आईबापानेच केली पोटच्या मुलीची बेल्टने मारहाण करत हत्या #nagpur


नागपूर:- नागपूर मध्ये अंद्धश्रद्धेच्या आहारी जात अवघ्या सहा वर्षाच्या मुलीची तिच्या आईवडिलांकडून हत्या करण्यात आली आहे. भूतबाधा झाल्याच्या संशयातून एका भोंदूबाबाने दिलेल्या सल्ल्यानुसार आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याच्या घटनेने नागपूरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईवडिलांना अटक केली आहे.
नागपूरच्या सुभाषनगर भागात ही घटना घडली असून मागील काही दिवसांपासून तिच्या हावभावात बदल दिसून आल्यामुळे भोंदूबाबाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानंतर तिला परवा रात्री जबर मारहाण करण्यात आली होती. लाथाबुक्क्या आणि बेल्टने मारल्यामुळे चिमुकलीला मार सहन न झाल्यामुळे ती निपचित पडली होती. त्यानंतर आईवडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या घटनंतर पोलिसांनी सदर घटनेतील आरोपी असलेल्या आईवडिलांना आणि तिच्या मावशीला ताब्यात घेत अटक केली आहे. त्यानंतर सल्ला देणाऱ्या भोंदूबाबाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
अंधश्रद्धेचं भूत मानेवर बसलं की काय होऊ शकत याची अजून एक प्रचिती आली असून आपल्या मुलीला भूतबाधा झाल्याचा संशय एका निष्पाप मुलीच्या जिवावर बेतलं आहे. ग्रामीण भागात घडणाऱ्या अंद्धश्रद्धेच्या घटना शहरी भागातही सर्रासपणे घडताना दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत