चंद्रपूर:- यंदा होणाऱ्या गुढीपाडवा नूतन वर्ष तसेच श्रीराम नवमी जन्मोत्सव शोभायात्रा समितीची 2023 या सालाची कार्य समिती ही घोषित करण्यात आली.
गुढीपाडवा उत्सव तसेच श्रीरामजन्मोत्सव निमित्त होणाऱ्या शोभायात्रा मध्ये मठमंदिर, गणेश मंदीर, माता मंदिर, विविध धार्मिक प्रतिष्ठान, झांकी, विविध सामाजिक संस्था, धार्मिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असनाऱ्या संस्था, यानिमित्त लागणारे स्टॉल्स, प्रतिष्ठान यांच्यापर्यंत सर्वस्पर्शी संपर्क तसेच शोभायात्रे ही मोठ्या उत्साहामध्ये होण्याकरिता ही कार्य समिती काम करेल. होणारी शोभायात्रा भव्यदिव्य व यशस्वी करण्याची जबाबदारी या समितीची असणार आहे. कार्यसमिती पुढील प्रमाणे
विश्व हिंदू परिषद तसेच श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे कार्याध्यक्ष श्री रोडमल गहलोत, यांनी कार्य समितीची घोषणा केली.
यामध्ये कार्याध्यक्ष माननीय श्री रोडमलजी गहलोत, उपाध्यक्ष राजगोपालजी तोष्णीवाल, विनोदजी तिवारी,कोषाध्यक्ष घनश्यामजी दरबार, सचिव विनोदजी उपाध्याय, सहसचिव विजय येगलवार, सुसेन मुंगेलवर महिला सदस्य सौ अंजलीताई हिरूडकर, अश्विनीताई दानी, क्षमाताई महाकाले, अनिताताई कासारलेवार, रेणूताई जोशी, वैदही मुडपल्लीवार,
समिती सदस्य कपिष उजगावकर, शैलेश दिंडेवार, शुभम दयालवार, एड आशिष मुंदडा, तुषार चौधरी, प्रकाश एकोणकर, अमित कर्पे, प्रवीण गिलबिले, भारती,कोटकर, सृष्टी डवरे अरविंद कुडमेथे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
होणाऱ्या गुढीपाडवा, श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा मध्ये सहभागी आणि यशस्वी करण्याचे आवाहन या समिती तर्फे करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत