Top News

मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय योजनांची गरज #chandrapur #Tiger


चंद्रपूर:- झाडाप्रमाणेच वन्यजीव हे सुद्धा एक नैसर्गिक संपत्ती आहे. जी केवळ पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम करीत नाही. तर आर्थिक, मनोरंजक, आणि सौंदर्यदृष्ट्या देखील फायदेशीर आहे. जंगल आणि वन्यजीव यांचे संरक्षण , संवर्धन आणि जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जाणीवजागृती निर्माण केल्या जात आहे. मात्र मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यावर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जंगलात वाघांचा अधिवास असणे हे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प याबाबत लक्षवेधी ठरला आहे. अन्नसाखळीतील वाघ हा प्राणी मुख्य घटक आहे. वाघांमुळे जंगलातील वनस्पती व इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त आहे. ते जंगल किंवा तेथील परिसर परिपूर्ण मानला जातो. जंगल उत्कृष्ठ असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते.

वनसंपदेमुळे प्राणिमात्रासाठी ऑक्सिजन , मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबविण्यासाठी मदत होते. पर्यायाने जंगलासाठी सर्व वन्यजीव वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. वाघ हा नैसर्गिक जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. चंद्रपूर जिल्हा हा घनदाट जंगलाने व्यापलेला असल्याने आणि जगप्रसिध्द व्याघ्र प्रकल्प असल्याने या जंगलात वाघ या प्राण्यांसह सांबर, चितळ, रानगवा, अस्वल, डुक्कर, असे असंख्य प्राण्यांचा संचार अधिक प्रमाणात असतो. शासनाकडून अभयारण्य, व व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी विविध योजना राबविताना मानवहीत नजरेआड झाल्यास टोकाचा संघर्ष निर्माण होतो. वाघ व अन्य प्राण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पोषक वातावरण तयार करावे. बप्पर आणि कोअर परिसरातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविताना सुसंवधाची गरज आहे.

व्याघ्र प्रकल्प परिसरात राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कोअर क्षेत्रावर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजा गावातच पूर्ण व्हाव्यात, आणि जंगलावरील निर्भरता कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार नवीन योजनांची आखणी केली पाहिजे. वन्यजीव सवर्धनासाठी केंद्र शासनाने विशेषत्वाने राबविण्यात येत असलेल्या शासन पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय उद्याने, व अभयारण्याचा व्याघ्र प्रकल्पात समावेश केला आहे. भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्र व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. वन संवर्धन अधिनियम १९८० या कायद्यात वनक्षेत्राचे कामासाठी उपयोगाबद्दल अनेक तरतुदी आहेत. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे मानवाचे जीवन जगणे कठीण होईल. जंगलातील वन्यजीव वाचविणे सर्वांचेच कर्तव्य आहे. सर्वांनी मिळून पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #India #Adharnewsnetwork Death of a girl #bhairavdiwase #police #Ghugghus #Police #Ingestionofpoison #Suicideattempt #Gandhinagar #girlfriend #wardhaRiver #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #girlfriend #boyfriend #videocall #Naigaon #Ghugghus # #beating #Tiger 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने