भद्रावती:- भद्रावती शहरातील बाजार वॉर्ड येथे राहणाऱ्या आयुध निर्माणी कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
समीर सुरेश सालवटकर (३४, रा. बाजार वॉर्ड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. समीर हा वडिलांच्या मृत्यूनंतर आयुध निर्माणी येथे कर्मचारी पदावर रुजू झाला होता. तो विवाहित असून घटनेच्या दिवशी त्याने घराच्या छताला दोर बांधून गळफास घेतला. भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत