दुचाकीवरील वेकोली कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला #chandrapur #durgapur #Leopard



चंद्रपूर:- वेकोली दुर्गापूर कोळसा खाणीत कार्यरत असलेला कामगार काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरातील दर्गा व बौद्ध विहारादरम्यान घडली. विकास उपरे दुर्गापूर असे जखमी कामगाराचे नाव आहे. या घटनमुळे कामगारांमध्ये दहशत पसरली आहे. (A leopard attacked a Vecoli employee on a two-wheeler)

विकास उपरे हे दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीतील विद्युत व यांत्रिकी विभागात कार्यरत आहे. द्वितीय पाळीत काम आटोपून दिलीप पोडे या सहकार्यासोबत रात्री ११ वाजताच्या सुमारास वसाहतीतील आपल्या क्वाॅर्टरकडे निघाले. उपक्षेत्रिय प्रबंधक कार्यालयाच्या काही अंतर पुढे गेल्यानंतर दर्गा व बुद्ध विहारादरम्यान असलेल्या झुडपात बिबट दबा धरून बसला होता. या परिसरात गतिरोधक असल्याने दुचाकीचा वेग कमी करताच बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले. प्रसंगावधान राखून त्यांनी दुचाकी समोर नेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने