चंद्रपुरात १४ जून रोजी ''लोकनेत्याला श्रध्दांजली वाहू या....'' #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपुरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थेतर्फे येत्या १४ जून रोजी दिवगंत खासदार स्व. बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. स्थानिक प्रियदर्शीनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित ''लोकनेत्याला श्रद्धांजली वाहू या'' ही श्रद्धांजली सभा सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केला आहे. संवाद प्रतिष्ठान या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहे.सह आयोजक म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, यंग चांदा बिग्रेड, शेतकरी संघटना, जनविकास सेना, मनसे, विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस, उलगुलान संघटना, अ.भा. रिपब्लिकन पक्ष, इको प्रो, सर्वोदय शिक्षण मंडळ, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर प्रेस क्लब, श्रमिक पत्रकार संघ, साई ग्रुप आफ इंन्स्टीटयुट, सोमय्या ग्रुप, फिमेल एज्युकेश सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, लोकमान्य टिळक स्मारक समिती, जिल्हा बार असोसिएशन, एमआयडीसी असोसिएशन, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, इंडियन मेडिकल असोसिएशन, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, भूमिपुत्र बिग्रेड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, फेडरेशन ऑफ टे्ड कामर्स असोसिएशन, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अखिल भारतीय सरपंच संघटना, केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, फेडरेशन ऑफ टेड कामर्स असोसिएशन, चंद्रपूर व्यापारी मंडळ, बहुजन मेडिको असोसिएशन, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अखिल भारतीय सरपंच संघटना, इंटक आदी संघटना, राजकीय पक्षांचा समावेश आहे. या श्रद्धांजली सभेला सर्वपक्षीय नेत्यांसोबत धानोरकर कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)