कोरपना तालुक्यात 70 गावांना पावसाचा तडाखा? #Chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील घराचे, गुरांच्या गोठ्याचे टिनपत्रे उडाली. अनेक झाडे उन्मळून पडली असून वीज पोलसुद्धा कोसळले. तालुक्यातील ११३ पैकी जवळपास ७० गावांना या पावसाचा तडाखा बसला. यात पैनगंगा नदी पट्ट्यातील गावात अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू


कोरपना, नारंडा उपकेंद्रांतर्गत ११ विजेचे खांब कोसळल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. कोडशी बु. कडे जाणारी जुन्या वीज लाइनचे पोल कोसळले. त्यामुळे कोशी बुद्रुक, कोडशी खू, गांधीनगर तांबडी, हेटी आदी गावातील वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प पडला आहे.

कोरपना शहरासह बऱ्याच गावात मोठमोठी झाडे उन्मळून पडली. कोरपना हातलोणी रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली. कोरपना तालुक्यातील वडगाव येथील शेतात कामाला गेलेल्या वैशाली गोवर्धन उरकुडे (वय 35 वर्ष) या महिलेच्या अंगावर झाड कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. अनेकांच्या दुकानाची फलकेही कोसळली. लग्न व कौटुंबिक समारंभाला वादळाचा फटका बसला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)