माजरी परिसरात स्थानिक नागरिकच रोजगारापासुन वंचित #chandrapur #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील माजरी परिसरात कोळश्याच्या खाणी असून वेकोली माजरी क्षेत्रामार्फत खाणीतील कोळसा व माती काढण्यासाठी खाजगी कंपन्यांना गेली अनेक वर्षांपासून टेंडर दिला जात आहे. मात्र या कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार दिला जात नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.

या कंपन्या बाहेर राज्यातून कामगार बोलवून त्यांच्या मार्फत अपले काम काढुन घेत आहेत. मात्र गावकरी अथवा स्थानिकांच्या हाताला काम नाही. ते बेरोजगार कामासाठी वन वन भटकत आहेत. या भागात छोट्या मोठ्या बर्‍याच खाजगी कंपन्या कार्यरत आहेत. परंतु त्यांच्या मार्फत स्थानिकांना रोजगारा पासून जाणिवपूर्वक वंचित ठेवण्यात येत आहे, असा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. त्यातच काही दिवसांपासून स्थानिक राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते संयुक्तपणे ह्या कंपन्यांकडे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळविण्यासाठी भेटी घेत आहेत. मात्र कंपन्यांच्या मालकांना पाझर फुटेल असा तिळमात्र सुद्धा विश्वास उरलेला नाही. बाहेरील राज्यातील कामगारांना काम देऊन स्वराज्यातील स्थानिक सुशिक्षीत, कुशल बेरोजगारांना मात्र डावलण्याच्या रोषाने संयुक्त आंदोलन उभारण्यात आले.

मात्र वेकोली प्रशासनाने आंदोलना मुळे वेकोली ला कोळसा उत्पादना मध्ये नुकसान झाल्याच्या आरोपावरुन कार्यकर्ते तसेच बेरोजगारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे गावकर्‍यांमधे, स्थानिक बेरोजगारांमधे असंतोष तथा असुरक्षिता निर्माण झाली आहे. कोळसा खाणी मुळे माजरी गावातील वातावरण दूषित होऊन पर्यावरणाला हानी पोहचत आहे. तरी सुद्धा पोटापाण्याच्या तथा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कोळसा खाणीत काहीतरी काम मिळेल या आशेने येथील जनता वेकोली प्रशासन माजरी क्षेत्राकडे बघत आहे. परंतु त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने गावकरी तथा स्थानिक बेरोजगार संतप्त झाला आहे. विशेष म्हणजे वेकोली ने नियम धाब्यावर बसविनार्‍या कंपन्यांना जाब विचारायचे सोडुन बेरोजगार युवकांचे भविष्य खराब करण्याचे तंत्र हाती घेतले आहे. असे स्थानिक गावकर्‍यांमार्फत सांगण्यात येत आहे व तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या