भद्रावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा #chandrapur #bhadrawati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे पक्षाचा २४ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला.
वर्धापनदिनानिमित्त भद्रावती येथील मुनाज शेख याच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॅाग्रेंस पार्टीचा ध्वजारोहण सोहळा पार पडला.यावेळी जिल्हाचे युवा नेते प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, राष्ट्रवादीचे नेते विलास नेरकर, तालुका अध्यक्ष तथा भटाळी ग्राम पंचायतचे सरपंच सुधाकर रोहनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष फयाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.युवराज धानेरकर, शहर अध्यक्ष सुनिल महाले, महिला शहर अध्यक्ष सबिया देवगडे, महिला तालुका अध्यक्ष दुर्गा बिश्वास, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष पनवेल शेंडे, अमोल बडगे,रोशन कोमरेड्डीवार,राकेश किनेकर, प्रमोद वावरे, संतोष वासमवार, इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

यावेळी मुनाज शेख कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेला २४ वर्षे पूर्ण झाली. आदरणीय शरद पवार साहेबांनी व सदस्यांनी आपापल्या परीने जनतेची सेवा केली. शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रश्नांची सोडवणूक देखील केली.

आपल्या पक्षाचे प्रमुख नेते देखील मातीशी जोडलेले आहेत. जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत ही कळकळ ठेऊन ते काम करतात. हे मी साहेबांना अहोरात्र काम करत असताना पाहिलं आहे.म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आज लोकांमध्ये विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
जनतेचा विश्वास येणाऱ्या काळात वाढवणं ही आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. हाच संकल्प या वर्धापन दिनी सर्व कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी पदाधिकारी व कार्येकर्ते यांना मार्गदर्शन करताना केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत