(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून या निकालात गुणवंत ठरलेल्या भावंडांचा ग्रामगीता आणि भगवी टोपी देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
वरोडा येथील कर्मवीर विद्यालयातील इयत्ता दहावीच्या मार्च २०२३ च्या परीक्षेत जयेश राजू गायकवाड या विद्यार्थ्याने ९६.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर येथीलच लोकमान्य कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रांजली प्रवीण गायकवाड हीने ९५ टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरे स्थान पटकावले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे वरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.अंकुश आगलावे यांनी शाल, श्रीफळ, ग्रामगीता आणि भगवी टोपी देऊन सत्कार केला आणि त्यांना उज्ज्वल भविष्याकरिता व स्वप्नपूर्तीकरिता आशीर्वाद दिला. तसेच तालुक्यातील सर्व प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले. यावेळी वरोड्याचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते डॉ.भगवान गायकवाड उपस्थित होते.
विशेष म्हणजे हे दोन्ही गुणवंत विद्यार्थी भाजपा नेते डॉ. भगवान गायकवाड यांचे नातेसंबंधाने नातू व नात आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत