शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत हळदा येथे महा राजस्व अभियान संपन्न #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0

आमदार वडेट्टीवार तसेच उपविभागीय अधिकारी भस्के याची उपस्थिती
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- हळदा या गावापासून तालुक्याचे अंतर ४० किमी असुन या भागातील नागरिकांना छाेट्याश्या कामासाठी ये-जा करावी लागते त्यामध्येही काही अधिकारी-कर्मचारी वेळेवर भेटत नाही त्यामुळे या नागरिकांना आर्थिक,मानसिक त्रास सहन करावा लागताे म्हणून अधिकारी-कर्मचारी यांनी या महाराजस्व अभियानांतर्गत नागरिकांची कामे तात्काळ करावीत असे आवाहन माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.ते काल हळदा येथे महसुल विभागाच्या वतीने आयाेजीत महाराजस्व अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बाेलत हाेते.

काल शुक्रवारला हळदा येथील ज्ञानगंगा विद्यालयात महसुल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानाचे आयाेजन करण्यात आले.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप भस्के उपविभागीय अधिकारी,उषा चाैधरी तहसीलदार,संजय पुरी गटविकास अधिकारी,रविंद्र घुबडे सहा.गटविकास अधिकारी,प्रभाकर सेलाेकर कार्याध्यक्ष तालुका काॅग्रेस,विलास विखार बांधकाम सभापती,प्रमाेद चिमुरकर माजी जी.प.सदस्य,प्रा.राजेश कांबळे माजी जी.प.सदस्य आदी मान्यवर उपस्थित हाेते.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.प्रास्ताविकातुन उषा चाैधरी तहसीलदार यांनी या महाराजस्व अभियानाचा उद्देश सांगुन मार्गदर्शन केले.तर प्रा.राजेश कांबळे यांनीही ग्रामीण भागातील नागरिकांनी या अभियानांतर्गत आपली कामे करून या महाराजस्व अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यानंतर कार्यक्रमात अन्नपुरवठा विभागाच्या वतीने नविन रेशन कार्डचेे वाटप करण्यात आले तसेच वनविभागाच्या वतीने पाणी गरम करण्यासाठी बम्ब वाटप करण्यात आले व ज्ञानगंगा विद्यालयातुन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा याव़ेळी सत्कार करण्यात आला.

या अभियानांतर्गत मंडपात आराेग्य शिबीर,बचत गटांच्या माध्यमातुन विविध उत्पादित वस्तुंचे स्टाल,आधार कार्ड अपडेट,शेतीसंबधी फेरफार नाव कमी करणे,नाव टाकणे,अन्नपुरवठा विभागाच्या वतीने नविन रेशनकार्ड,रेशनकार्ड मधील नावे कमी-किंवा नविन नावे टाकणे,महासेतुच्या माध्यमातून विविध प्रकारचे दाखले आदी कामे या अभियानांतर्गत करून देण्यात आली.या कार्यक्रमाला महसुल विभागाचे आकाश भाकरे मंडळ अधिकारी,नरेश बोधे मंडळ अधिकारी,बिएल.मडावी,एम.जे कुडावले तलाठी,विशाल काेरडे तलाठी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित हाेते.या कार्यक्रमाचा परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला असुन गावातील प्रमुख व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)