Top News

मोदी सरकारकडून शेतकर्‍यांच्या हिताला नेहमी प्राधान्य! - भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे #chandrapur

चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातील लोककल्याणकारी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागील नऊ वर्षांपासून सातत्याने पावले उचलली, त्यामुळे देशातील शेतकर्‍यांना याचा नेहमीच फायदा झाला. बुधवारी (दि. ७) खरीप हंगाम २०२३-२४ यासाठी केंद्र सरकारने विविध पिकांच्या किमान आधारभूत (MSP) कींमती जाहीर केल्या त्यामध्ये धान, कापुस, सोयाबीन, तुरडाळ, मुंग यासह अनेक खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देण्याची मोदी सरकारची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

केंद्र सरकारने २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी धानाच्या किमान आधारभूत किंमतीत म्हणजेच हमीभावात मागील वर्षीच्या २०४० प्रति हेक्टरच्या तुलनेत २१८३ रूपये प्रति. हेक्टर अशी वाढ केली आहे. तसेच कापसाच्या हमीभावात ६३८० वरून ७०२० रुपयांची तर सोयाबीन पिकाच्या हमीभावात ४३०० वरून ४६०० रूपयांची वाढ केली तर तिळाच्या हमीभावात ७८३० वरून सर्वाधिक अशी ८६३५ रुपयांची वाढ, मुगाच्या हमीभावात ७७७५ वरून ८५५८ रुपयांची वाढ, तुरडाळीच्या हमीभावात ६६०० वरून ७००० रूपयांची वाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे धोरण अवलंबीत पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने