कुणबी समाज संघटनेचा "त्या" व्हायरल पत्राशी कुठलाही संबंध नाही #chandrapur #chandrapurloksabha

कॉंगेसने पत्रकार परिषदेत दिली माहिती
चंद्रपूर:- उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राजकीय पक्षांकडून कुणबी समाजाच्या नावावर राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर समस्त कुणबी समाजाच्या नावाने एक पत्र अलीकडेच सोशल मीडियावर वायरल करण्यात आले आहे.

Source What'sup (समाज माध्यमात पत्रक व्हायरल)

"चुकीला माफी नाही" या शीर्षकाखाली हे पत्र व्हायरल करण्यात आले. या पत्रातून आमदार प्रतिभा धानोरकर यांचा लोकसभा मतदारसंघावर कसा अधिकार आहे हे दाखवण्यात आले. समाजाच्या नावावर भावनिक आवाहन करण्यात आले. या पत्रात त्यांनाच उमेदवारी मिळावी या हेतूने ते पत्र त्यांनीच कार्यकर्त्यांमार्फतीने वायरल केल्याचे नाकारता येत नाही. या पत्राचा विचार केला तर कुणबी समाज संघटनेच्या वतीने कधीही राजकारणात असे दावे केले जात नाही.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद


जिल्ह्यात कुणबी समाजाची कुणबी समाज संघटना म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा आहे. एक व्यवस्था आहे. ही व्यवस्था जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. कुणबी समाज समाज संघटनेला जर प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी मिळावी, असे वाटले असते तर कुणबी समाज संघटनेने यादृष्टीने कॉंग्रेस पक्षाकडे अधिकृत पत्रव्यवहार केला असता, मात्र समस्त कुणबी समाजाच्या नावावर असे बोगस पत्र तयार करून ते व्हायरल केले नसते. समस्त कुणबी समाजाच्या नावाचा वापर करून काढलेल्या पत्राने कुणबी समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कुणबी समाजाने कधीही कोणत्याही राजकीय पक्षाला कुणाला उमेदवारी द्यावी, असं कधीही पत्र काढलेलं नाही. यापूर्वी 2019 मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर मैदानात आले. त्यावेळी सुद्धा कुणबी समाजाने अशा पद्धतीने कधीही पत्र काढले नव्हते. त्यांना उमेदवारी द्यावी अथवा देऊ नये या संदर्भातही कुणबी समाजाने कधी वाच्यता केली नाही. समाजातील घटक अनेक पक्षात आहे. कार्यकर्ते म्हणून त्यांनी केलेली मागणी म्हणजे कुणबी समाजाची मागणी होय, असे समजणे चुकीचे आहे.


समाज एक स्वतंत्ररित्या काम करतो. कुणी समाजाला गृहीत धरून कुणी आपला राजकीय फायदा घेत असेल तर समस्त कुणबी समाज संघटनेच्या वतीने मी त्या कृतीचा निषेध करतो. कुणबी समाजाचे नेते स्वर्गीय एडवोकेट मोरेश्वरराव टेंभुर्डे यांनी बाळूभाऊ धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते जिंकले. त्यानंतर प्रतिभाताई धानोरकर या सुद्धा आमदार झाल्या. मागील चार वर्षात या दाम्पत्याने समाजाची कोणती परतफेड केली हे त्यांनीच सांगावे. उलट एडवोकेट मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या बाबतीत या कुटुंबियांनी जाहीर अपशब्द काढले. टेंभुर्डे साहेबांनी धानोरकर यांना पुढची लोकसभेची तिकीट देऊ नये, यासाठी स्वतः सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते, ही बाब समाज अजून विसरलेला नाही.

मागील पाच वर्षात केवळ समाजाचे राजकारण एवढच धोरण धानोरकर दांपत्याने ठेवलं होतं आणि आता या समाजाच्या बळावर त्या उमेदवारीची दावेदारी करीत आहे हे कुठेतरी चुकत आहे. कुणबी समाजाला गृहीत धरून त्यांनी उमेदवारी मागू नये. उमेदवारी मिळविणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यात समाजाला गोवू नये. समाज म्हणजे पार्टी नव्हे. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

डाॅ. विजय देवतळे,नंदु नागरकर,विनायक बांगडे, डॉ.सुरेश महाकुलकर, सुर्यकांत खनके,शफी अहमद,बबनराव फंड, प्रविण पडवेकर, अशोक मत्ते अमजद इराणी,सुनिता लोडीया,अनुताई दहेगावकर, वसंतराव देशमुख, सतिश घोडमारे यासह ईतर कार्यकर्ते झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने