Reservation for the post of Sarpanch : सरपंच पदाकरीता पाच ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित

Bhairav Diwase


चंद्रपूर:- शासन अधिसूचनेनुसार मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल रिट याचीका 4671/2023 मध्ये दि. 10 ऑक्टोंबर 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार, दि. 01 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीसाठी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता सरपंच पदाचे आरक्षण नव्याने निश्चित करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी उपरोक्त कालावधीत असलेल्या निवडणुकांकरीता तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे आरक्षण संख्या निश्चित करुन देण्यात आलेली होती.

त्यानुसार, चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा, वायगांव मो., पिंपळखुट, गोंडसावरी व चेकनिंबाळा या 5 ग्रामपंचायती करीता संरपच पदाचे आरक्षण सोडत दि. 23 डिसेंबर, 2024 रोजी दुपारी 2 वाजता तहसिल कार्यालय, चंद्रपूर येथे काढण्यात आली.

या ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित:

संरपच पदाचे आरक्षण सोडतीमध्ये तालुक्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता पिंपळखुट, वायगांव मो., सर्वसाधारण स्त्री करीता गोंडसावरी आणि पांढरकवडा तर सर्वसाधारण प्रवर्गाकरीता चकनिंबाळा या ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चीत करण्यात आले आहे.