या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ परमानंद अंदनकर व सन्मित्र मंडळाचे सचिव ऍड.,निलेश चोरे यांची उपस्थिती राहणार आहे.अशी माहिती प्राचार्य अरुंधती कावडकर यांनी सैनिकी शाळा येथे सोमवारी(दि 23)दिली.शाळेच्या दैनंदिन शिक्षणातून दिल्या जाणाऱ्या सैनिकी प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. असेही त्या म्हणाल्या.
यावेळी समदेशक कमांडर सुरींदरकुमार राणा,विद्यार्थी नायक भानुदास वाढणकर यांची उपस्थिती होती.