World chess championship 2024: डी गुकेश बुद्धीबळ पटाचा नवा 'राजा': ठरला विश्वविजेता

Bhairav Diwase

भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. विश्वानाथन आनंदनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा बुद्धीबळपटू ठरला आहे. 18 वर्षांचा डी गुकेश सर्वात कमी वयात विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. 55व्या चालीत चीनच्या डिंगने चूक केल्यामुळे गुकेशच्या चिकाटीला यश मिळाले, त्यामुळे गुकेशने ऐतिहासिक विजय मिळवला.

दरम्यान, 1988 मध्ये जेव्हा विश्वनाथन आनंदने ग्रँडमास्टरचे विजेतेपद मिळवले, तेव्हा तो भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनला, ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बुद्धिबळाच्या व्यक्तिरेखेला लक्षणीयरीत्या उंचावणारा एक महत्त्वाचा क्षण ठरला होता. अशातच आता डी गुकेश याने विश्वनाथन आनंद यांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विश्वनाथन आनंद यांचा सर्वात कमी वयाचा रेकॉर्ड गुकेशने मोडून काढलाय.


कोण आहे डी गुकेश?

बुद्धिबळातील नवीन चाणक्य डी गुकेशचा जन्म 29 मे 2006 रोजी चेन्नई (तामिळनाडू) येथे तेलुगू कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव डोम्माराजू गुकेश आहे. त्याचे पालक आंध्र प्रदेशातील गोदावरी डेल्टा भागातील आहेत. त्याचे वडील डॉ. रजनीकांत हे कान-नाक आणि घसा सर्जन आहेत, तर आई पद्मा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. वयाच्या सातव्या वर्षी तो बुद्धिबळ खेळायला शिकला. तो चेन्नईतील वेल्लामल विद्यालयात शिकतो. डी गुकेशने वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर विजेतेपद पटकावले आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. त्यानंतर त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावलं होतं.

काय म्हणाला डी गुकेश?

मी सर्वात तरुण चॅम्पियन असण्याचा कधीही विचार केला नाही फक्त बुद्धिबळ खेळायचे होते. चॅम्पियनशिपचा सर्वोत्कृष्ट भाग म्हणजे जेव्हा मी 2013 मध्ये खेळासाठी खोलीत प्रवेश केला तेव्हा मला बुद्धिबळ चॅम्पियनशिप खेळ पाहण्यासाठी जागा देखील मिळाली नाही. मी यावेळी खेळलो तेव्हा, सर्वोत्तम भाग म्हणजे खोलीत भारतीय ध्वज पाहण. मी भावूक होतो आणि मला चॅम्पियनशिप जिंकण्याची अपेक्षा नव्हती, असं डी गुकेश म्हणाला आहे.