लोकमान्य ज्ञानपीठ कॉन्व्हेंट येथे आनंद मेळावा संपन्न

Bhairav Diwase

भद्रावती (जितेंद्र माहुरे भद्रावती प्रतिनिधी):- १० डिसेंबर २०२४: लोकमान्य ज्ञानपीठ येथे आज आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले कौशल्य सादर केले. मेळाव्याचे मुख्य आकर्षण फुड फेस्टिवल आणि डिश स्पर्धा होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध चविष्ट पदार्थांची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थांचाही समावेश होता.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून मेळाव्याला आणखी उठाव दिला. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी लोकमान्य महाविद्यालयाचे प्रा. नितीनजी लांजेवार , सौ. स्वाती गुंडावार, गायकवाड, आणि लोकमान्य ज्ञानपीठ कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापिका सौ. पूनम संजय ठावरी उपस्थित होत्या. याशिवाय शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही आपली उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला. हा मेळावा विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी संस्मरणीय ठरला असून सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरला आहे.