Personality Development: सरदार पटेल महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय "व्यक्तिमत्व विकास" तीन दिवासीय कार्यशाळा आयोजित

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दि. 4 मार्च 2025 रोजी  सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठस्तरीय "व्यक्तिमत्व विकास" तीन दिवासीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले. 

या कार्यशाळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, मार्गदर्शक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश बोरकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, एल. के. एम. आई. एम. एस. आर. कोसराचे डॉ. फारुख शेख, डॉ. विवेक कवाडे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखाद्याचे व्यक्तिमत्व कालांतराने विकसित करणे, वाढवणे आणि बदलणे ही प्रक्रिया होय. असा विकास आयुष्यभर नैसर्गिकरित्या होतो, परंतु तो जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांद्वारे देखील सुधारित केला जाऊ शकतो. जेव्हा आपण नवीन लोकांना भेटतो तेव्हा बहुतेकदा त्यांचे व्यक्तिमत्व आपले लक्ष वेधून घेते. 

या कार्यशाळाच्या प्रथम सत्राचे मार्गदर्शक डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी निष्ठेने कार्य करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्यातील कौशल्याचा विकास होणे आवश्यक आहे. 

तसेच दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक एल. के. एम. आई. एम. एस. आर. कोसराचे डॉ. फारुख शेख म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचे अद्वितीय व्यक्तिमत्व बनवणारे संघटित विचार आणि वर्तन नमुने कालांतराने उदयास येतात. अनेक घटक व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडतात, ज्यात अनुवंशशास्त्र आणि वातावरण , आपले पालकत्व कसे होते आणि सामाजिक परिवर्तने यांचा समावेश आहे. तसेच तिसऱ्या सत्राचे मार्गदर्शक डॉ. प्रकाश बोरकर म्हणाले की, व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासातील मुख्य सिद्धांतांपैकी एक म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा गुणधर्म सिद्धांत. या सिद्धांतानुसार, गुण व्यक्तिमत्त्व बनवतात. गुणांचे वर्णन वर्तन, विचार किंवा भावनांचे नमुने म्हणून केले जाऊ शकते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुरुषोत्तम माहोरे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन रसेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले तर आभार डॉ. निखिल देशमुख यांनी मानले.